Posts

अंतर्मन खुणावत आहे

Image
अंतर्मन खुणावत आहे.      एक दिवस असाच मनामध्ये असंख्य प्रश्नांचे काहूर घेऊन बाहेर पडलो. दुचाकीवर स्वार होऊन वाट दिसेल त्या दिशेने निघालो, वळणे वळणे घेत आणि ओबडधोबड रस्त्यावर चालून शांत , निर्जन, एकाकी आणि प्राचीन आशा शिवमंदिराजवळ येऊन थांबलो. मनाला शांती मिळेल आणि प्रश्नांची उत्तरे ही मिळतील म्हणून मंदिरात जाऊ म्हटलं.         प्राचीन पण मोडकळीस आलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. समोर गाभाऱ्यात नुकतीच कोणीतरी पूजा करून गेलं असावं, कारणं हवेत अजूनही त्या उदबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि शिवलिंगावर वाहिलेली पांढरी फुलं अजून टवटवीत होती. गाभाऱ्यातील दिवा मंदपणे तेवत होता. गाभाऱ्यात जायची इच्छा नव्हती म्हणून सभामंडपात एका खांबाला टेकून बसलो. मंदिरातील गारवा मनाला शांती देत नव्हता मनातील प्रश्न अजूनही तसेच होते. असे का.?? माझ्यासोबतच का..?? माझं काय चुकलं..?? का मलाच नेहमी अपयश..? का माझ्यासोबतच अडथळ्यांची शर्यत..?? 'रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा' असा मी म्हणतोय खरं पण खरंच माझा रंग वेगळा आहे का..?...

वसंतगड :- पौर्णिमा आणि तीन भटके.

Image
वसंतगड भटकंती पौर्णिमेच्या रात्री.      किर्रर्रर्र अंधारी रात्र तीन भटके शिवकाळ अनुभवावा या इच्छेने गडावर भटकत होते, सोबत ना बॅटरी ना मोबाईल फक्त साक्षीला तो चंद्र आणि त्याचा प्रकाश . त्यातील एक गडकोटांबद्दल बोलतोय, एक इतिहासातील गोष्टी सांगतोय तर एक इतिहासातील कल्पनांमध्ये गुंग. इतका मोठा गड त्याचा पसाराही तितकाच असणार ना..? मग वेळ तर लागणारच की.. तर गोष्ट अशी,          महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या 'टीम वसंतगड' तर्फे 'वसंतगड किल्ल्यावर' मशाल मोहोत्सव घेण्यात आला , गडावर जणू शिवकाळ अवतरला मशाली घेऊन सर्व गड फिरून झालं आणि मशाल मोहोत्सव संपला. रात्रीचे 2 वाजले असावेत सगळे झोपी गेले पण 3 जण जागे होते ज्यांना दंगामस्ती करून झोप येत नव्हती. तिघांचं नियोजन ठरलं  आज पौर्णिमा. रात्रीचा गड फिरायचा..!! शिवशाहीत मावळे जसे रात्रीचे फिरत तसे गडाच्या तटाबुरुजावरून फिरून मनसोक्त  गड फिरू. तोही विना बॅटरी आणि मोबाईल घेता, चंद्र आहे सोबतीला तो दाखवेल तेव्हढं पाहायचं आणि येऊन झोपायचं ठरलं..          तिघेही उठ...

मोहिमेतील एक अविस्मरणीय आठवण.

Image
★मोहिमेतील न विसरता येणारी आठवण★ मोहिमेचा दिवस ४था (२९ जानेवारी) वेळ दुपारी ४ वाजता.. ठिकाण - मोहिमेचा भंडारा (गाव लक्षात नाही.)          आम्ही चार जण स्वागत, रोहित (रोह्या) , पैलवान आणि मी. बाकी आमचे पाच मित्र चुकलेले(किंवा आम्ही चुकलेलो😄)       तर झालं असं की बलकवडी मुक्कामावरून निघाल्यावर मोहिमेच्या प्रचंड गर्दीतून सर्वजण रायरेश्वरकडे निघालो खरे पण गर्दीमुळे आणि एकेरी रस्ता असल्याने आमुची चुकामुक झाली. कित्येक तास एकेरी रांगेत रस्ता चढून डोंगरावर आलो आणि थोडाफार खाऊन (जे थोडंच शिल्लक होत) आणि लिंबूपाणी पिऊन परत डोंगर उतरण्यासाठी एकेरी रांगेत लागलो, उतरत उतरत खाली पोहोचायला आम्हला ४ वाजले. थोडंफारच खाल्ल्याने भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणावर पोहोचलो आनि तिथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. सांगायला तर तो फक्त मसाले भात आणि आमटीच होती पण त्याची तुलना पंचपक्वनाहूनही अधिक होती आमच्यासाठी. पोटभर (पोट भरून थोडं वर😅) जेऊन आम्ही रायरेश्वर कडे जायला मार्गस्थ झालो.                ड...

!! श्रीराम मंदिर , चाफळ !!

Image
                   सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.       समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श...

विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली

Image
..विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली..      इतिहासात मराठ्यांची राजधानी असणारी ऐतिहासिक सातारा नागरी आणि सातारा जिल्हा संपुर्ण जिल्ह्यात मराठा इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे. अशाच मराठा इतिहासाच्या खुणा असणारे एक ठिकाण सातारा पासून चार किमी अंतरावर आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर असल्यामुळे या गावाचे दोन भाग आहेत अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाध्या नदीच्या काठी आहेत. याशिवाय प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात येथे एकूण दहा मंदिरे बांधली असून ती सर्व नदीच्या काठावर आहेत. आज विश्वेश्वर मंदिराबद्दल बोलू बाकी मंदिराबद्दल परत कधीतरी लिहिनच. ..विश्वेश्वर मंदिर..         विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमस्थानावर आहे. सातारा गेझेटिअर नुसार हे मंदिर १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे . नदीच्या बाजूने प्रवेश आलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत.  ता...

खंडेराया स्तोत्र

                 मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला । हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।। कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला । बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ  चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।    त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।। ज्यांनान कळे तुझ्या भक्तीचे वर्म । त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।। जयदेव जयदेव जय खंडेराया ।अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।। तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव । जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।। मध्वनाथ जपतो येळकोट भैरव । निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

!!. सौदामिनी .!!

!!.  सौदामिनी .!! आधीच धुमसत होते अंतर, त्यातच ठिणगी पडली जशी; सुरुंग उडला जसा निघाला सहा शिपायांनिशी. -१ राव इरेचा असा, पेटता डोंबच त्याच्या मनी, कडकडत्या खडगात नाचती तृषर्त सौदामिनी. -२ सुर्यरथाचे अश्व निखळले आले पृथ्वीवरी, चौखुर उधळत धरणी विंधीत गेले वार्‍यावरी. -३ शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी, काळोखाच्या छाताडावर थै थै नर्तन करी. -४ सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा धीर, वीर न वेडे पीर निघाले सात शीवाचे तीर. -५ - श्री.शिरीष गोपाळ देशपांडे. तव शौर्याचा एक अंश दे ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे !  तव तेजांतिल एक किरण दे ! जीवनांतला एकच क्षण दे !  त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ! पुसू पानिपत !  पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !! "राजवंदना" - बाबासाहेब पुरंदरे

औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट

Image
औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट.      २५ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला . आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला. ५ जून १६५९ रोजी औरंगजेबाने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला आणि ९ जून रोजी दारा आणि सिपाहर शिकोह या दोघांना कैद केले. दारा पकडल्यागेल्यानंतर दाराला पूर्ण कल्पना होती कि आपण मारले जाणार आहोत. औरंगजेबाने दारासोबत केलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन मनुचीने आपल्या " स्टोरियों द मोगोर " या ग्रंथात केली आहे तो लिहितो..         दाराच्या देहांताच्या शिक्षेचा हुकूम काढण्यापूर्वी औरंगजेबाने त्याला निरोप पाठवून असे विचारली कि " दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते आणि मला ( औरंगजेबाला ) तू कैद केले असतेस तर तू काय केले असतेस ? " काही जरी झाले तरी औरंगजेब आपल्याला जिवंत ठेवणार नाही आणि हा प्रश्न आपला उपहास करण्यासाठीच विचारलेला आहे हे दारास ठाऊक होते. दाराने राजपुत्र या दृष्टीने आप...

श्री समर्थ रामदास स्वामी

Image
हा लेख मी मार्च 2015 मध्ये लिहिला होता त्यामुळे काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. चूक भूल देणे घेणे.._/\_ जय श्री राम श्री राम समर्थ आज राम नवमी सर्वाना हार्दिक शुभेच्या.... तसेच श्री रामचंद्राचे परम भक्त श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्मदिवस.  त्यानिमित्त समर्थां विषयी थोड़ी माहिती..... श्री समर्थांचे मूळ नाव नारायण ठोसर-कुलकर्णी. त्रिम्बकपंत हे त्यांचे आजोबा व सूर्याजीपंत हे वडील सदैव परमेश्वर भक्तित निमग्न असत. अशा थोर कुळात श्री सूर्यनारायनाने अंशेकरुन  सौ. राणुबाई पोटि शके १५३०  मधे चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी किलक नाम सवत्सर या शुभ दिनी मध्यानकाली जांब येथे समर्थ यांच्या रूपाने अवतार धारण केला ... पुढे समर्थांनी कृष्णतीरी राहून जग उद्धार व धर्मसंस्थापना  केली आणि ठोसर कूल पावन केले . समर्थानी सारा महाराष्ट्र देश पावन केला आणि सनातन वैदिक धर्माची ध्वजा अखिल भरतखंडात फडकवली.... "राघवाचा दास मी झालो पावन ।। पतित तो कोण उरो शके"  ।। या दुर्दम्य धड़ाडीने श...

शिवरायांचे सरसेनापती

Image
🚩जय शिवराय निर्मिले स्वराज्य हिंदवी //                                                लाजले कि शशिरवि // प्रतिपच्चंद्र लेखवि //                          किर्ति ऐसी जाहली//          केवळ नूतन सृष्टी निर्माण करनारे छत्रपती शिवाजी महाराज हे आणि या नूतन सृष्टीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करनारे त्यांचें शूर" सरसेनापती" यांविषयी सर्वांच्याच मनात आदराचे स्थान आहे .         शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रभाव हिंदुस्थानातील सर्वांच्या मनावर आहे अशा छत्रपती शिवाजी महराजांनी ..... " ज्या ज्या उपाये शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करुन साल्हेरी - अहिवंतापासुन चंदि- कावेरी तिरपर्यंत निष्कटक राज्य; शतावधि कोटकिल्ले , तैसिच जलदुर्गे व कितेक विषम स्थळे हस्तगत केली....." दिगंतिविख्यात कीर्ती संपादिली. लोकसंग्रह केला. मातृभूमीचे संरक्षण हे...

मराठा लष्कर

Image
|| श्री मल्हारीमार्तण्ड ||    लष्कर हे राज्याचे बळ असते. लष्करी प्राविण्यास माणसामधे शिस्तीची गरज असते आणि त्यांच्या नेतृत्वास सामान्य ज्ञानाची आणि प्रचंड कल्पनाशक्तीची गरज असते. या सर्व गोष्टींसोबत हवी असते निष्ठा आणि एक प्रकारची राष्ट्रीय वृत्ती.      देवगिरीच्या रामदेवराय यादवाचे स्वतंत्र राज्य प्रचंड सेनादल असतानाही अल्लाउद्दीन खिलाजीच्या लहान सेनेने जिंकून घेतले. पुढे त्याच्या मुलाने आणि जावयाने पारतंत्र्याचे जोखड उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ...!! सेनादल असतानाही हरण्याचे कारण होते सेनेची निष्ठा ही केवळ राजापुरती मर्यादित होती . संपूर्ण राज्यासाठी नव्हती . त्यानंतर अनेक शतके मराठ्यांना स्वातंत्र्य पाहता आले नाही.        पण मधल्या काळात मराठे गप्प नव्हते . ते लढत होते , झुंजत होते , रक्तपात करत होते . पण ते लढत होते परकीय सत्तेसाठी आणि तेही स्वकीयांविरुद्ध . तेहि वतनासाठी . त्यांच्याजवळ राष्ट्रिय वृत्ती नव्हती असे नाही पण त्यांच्यातील राष्ट्रिय वृत्तीची कल्पना अजुन  निर्माण झाली नव्हती.   ...

शिवभूषण निनादराव बेडेकर

Image
!!.. मला न पाहता आलेले निनादराव ..!! !!.. शिवभूषण निनादराव बेडेकर..!!      'श्री आदिशक्ती तुळजा भवानी ' हे शब्द कानी पडावे आणि पटकन डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहावी. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीत बोलावं आणि सर्व श्रोत्यांनी ते आपल्या कानात साठवाव.. असे व्यक्तिमत्व..       दुर्दैवाने " निनादराव बेडेकर " यांना भेटण्याचा किंवा पाहण्याच्या, ऐकण्याचा  योग कधी आलाच नाही . त्यांच्या गेल्यानंतर मला त्यांच्या कार्याची ओळख झाली.. २ वर्ष झाली असतील फेसबुक वगैरे सोशल मीडियावरून निनादराव गेल्याचे समजले अनेकजण त्यांच्या आठवणी फेसबुक वर टाकत होते त्या सर्व आठवणी वाचून कोणीतरी मोठे व्यक्ती आपल्यातून गेले आहेत याची जाणीव मला झाली.     मी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला , थोड्या दिवसात मला निनादराव यांच्या सर्व व्याख्यानांची लिंक मिळाली आणि मी सर्व डाउनलोड केली..            निनादजींचे पाहिले मी ऐकलेले व्याख्यान होते.. " शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण"  . हे व्याख्यान ऐकून मी अक्षरशः निनादज...

हंबीरराव मोहिते यांची तलवार

Image
!!..हंबीरराव मोहिते यांची तलवार..!!        समज - गैरसमज समज -       अनेक दिवसांपासून ( खरंतर महिन्यांपासून ) सोशल मीडियावर एका तलवारीचा फोटो फिरतोय आणि त्यासोबत एक पोस्ट फिरत आहे की " ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार याच तलवारीने त्यांनी प्रतापगड च्या युद्धात ३०० शत्रू मारले म्हणून यावर ३ शिक्के कोरलेले आहेत"  सदरची तलवार पाहिल्यावर कोणीही सांगेल की ती बनावट आहे , अशी कोणतीही तलवार उपलब्ध नसून या फोटोतील तलवार ( चित्र क्र.१ ) बनावट आहे. गैरसमज.-         प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरात एक मराठा मुठीची धोप तलवार ठेवलेली आहे. जनमानसात असा समज आहे की ती तलवार ' सरसेनापती हंबीरराव मोहिते ' यांची आहे पण माझ्या मते तो एक गैरसमज आहे . ती तलवार हंबीरराव मोहिते यांची नाही.        भवानी मातेच्या मंदिरातील त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हंबीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हंबीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक विराची आह...

स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेधे

Image
!! वतन साहेबाच्या पायावरी ठेवले !!       अफजलखान स्वारीच्या वेळी कान्होजी नाईक जेधे यांना मावळच्या देशमुखबराबरी फर्मान आले होते ते फर्मान घेऊन आपल्या पाच पुत्रांसोबत शिवाजी राजेंकडे राजगड येथे गेले आणि त्यांना फर्मान दाखवले तेव्हा शिवाजीराजे म्हणाले की,       "तुमचे शेजारी केदारजी व खंडोजी खोपडे देशमुख ताा उत्रोली हे अफजलखानाकडे गेले. तुम्ही पातशाही हुकूम मोडून राहिले म्हणजे वतनास अपाये होईल. जिवावरी गोष्ट येऊन संकट पडले, याकरिता तुम्हीही जाणे." त्यावरी कान्होजी नाईक बोलिले की,       महाराजांनी आपली क्रिया घेऊन तुमचे हाती दिली तेच क्रिया  व इमान आपला शाबूत आहे . 'वतन साहेबाच्या पायावरी ठेविले.' आपण व आपले लेक साहेबाच्या पुढे खस्त होऊन तेव्हा जे होणे तें होईल. कान्होजी नाईक ऐसे बोलून शपथ केली. त्यावरी राजश्री स्वामी बोलिले की , हातावरी पाणी घेऊन वतनास घालणे. आग्येप्रमाणे वतनास हातावरी पाणी घेऊन सोडिले. संदर्भ - जेधे शकावली. चित्र- गुगलवरून ●संतोष अशोक तुपे #अजरामर_उद्गार #इतिहासाच्या_पाऊलखुणा

"शिवराय गोब्राम्हणप्रतिपालकच"

Image
"गोब्राह्मणप्रतिपालक शिवराय " नरहर कुरुंदकर यांच्या व्याख्यानातून...       ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणांना नोकऱ्या देणं अशी अनेकांची समजूत आहे . पण तस काही नाहीये कारण ब्राह्मण हा वेदांचा अभ्यासक असला पाहिजे , हा वेदांचा अभ्यासक असलेला ब्राह्मण जर धार्मिक कृत्ये करतो , या धर्मकृत्यांचे संरक्षण आणि त्याचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी नोकऱ्या , व्यापार आणि जीवनाच्या सगळ्याच नाड्या आखडून धरण्याची परवानगी म्हणजे ' ब्राह्मणप्रतिपालक'.          'गोब्राह्मणप्रतिपालक' यातील गो म्हणजे गाय नावाचं जनावर नव्हे हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. गो हे हिंदू धर्माच्या अभिमानच प्रतीक आहे. उदा. राष्ट्रध्वज हा चिंध्यांचा तुकडाच असतो, त्यात एक तांबडा कापड असतो ,एक पांढरा कपडा असतो आणि एक हिरवा कपडा शिवलेला असतो. पण ज्यादिवशी तो सगळ्या राष्ट्राच्या वैभवाचं प्रतीक म्हणून उभा राहतो त्या दिवशी तो राष्ट्रध्वज उभा कि आडवा , खाली का वर हा जगण्या मारण्याचा प्रश्न होऊन जातो.       हे जे गाई नावाचं जनावर आहे दोन शिंगांचं हे जोपर्यंत जनावर ...

शिवरायांची धार्मिकता

Image
जय शिवराय हिंदुधर्माभिमानी शिवराय शिवराय हे हिंदूधर्माभिमानी होते काय .....???? शंका वाटतेय....?? बर पुढील मुद्दे वाचा.. 🌑 शिवरायांची धार्मिकता आणि देवस्थानांना केलेली मदत  १. दादाजी नरसप्रभु आणि शिवरायांनी रायरेश्वराच्या पुजेअर्चेची व्यवस्था केली (२६ मे १६४२) २. पुण्यात आल्यावर शिवरायांनी आणि आईसाहेबानी एक गणपतीचे मंदिर बांधले त्यास नंदादीप दिला.(१९ मार्च १६४६) तोच पुण्याच्या प्रसिद्ध कसब्याचा गणपती. ३. दादाजी नरसप्रभु देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात राजे म्हणतात...--                 श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रिलगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करुण पुरविणार आहे. ४. सभासद बखर सांगते -  मुलूखांत देवदेवस्थाने जागजागा होती त्यास दिवाबत्ती , नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. वैदिक ब्राम्हण यांसी योगक्षेम, ब्राम्हण विद्यावंत, वेदशास्त्रसंपन्न, ज्योतिषी, अनुष्ठानी, तपस्वी गावोगावी सत्पुरुष पाहून त्यांचे कुटुंब पाहू...

ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे काय..??

Image
..शहाजहान आणि मुमताजचे अमर प्रेम.. (कि विकृत प्रेम )     मोगल बादशहा खुर्रम उर्फ शहाजहान आणि त्याची बायको 'मुमताजमहाल' यांच्या प्रेमाचे आपल्याकडे दाखले दिले जातात. अमर प्रेम वगैरे उपमा दिल्या जातात . " प्यार होतो शहाजहान जैसा हो, जिसने अपने प्यार के लिये ताजमहल बनवाया " असे डायलॉग आपल्याकडे सिनेमातून तर येतच असतात. पण हे नक्की प्रेम आहे का ? इतिहास काय म्हणतो हे आपण पाहू.          शहाजहान आणि मुमताजचे लग्न झाल्यापासून मुमताज वीस वर्षे जगली. शहाजहानाचे मुमताज वर इतकं प्रेम (?) होतं कि या वीस वर्षात मुमताजला चौदा अपत्ये झाली. त्यामधील पहिली सहा मुले तिला इ. स. १६१३ ते १६१८ अशी सलग सहा वर्षे झाली ( प्रत्येक वर्षी एक ) या चौदामधील आठ मुलगे आणि सहा मुली होत्या , या सततच्या प्रसूतीमुळे त्यापैकी आठ अपत्ये लहानपणीच मरण पावली. आणि एवढं झाल्यानंतर व्हायचं तेच झालं मुमताजचा मृत्यू तेरा वेळा प्रसूत झाल्यानंतर चौदाव्या खेपेस बुऱ्हाणपूर येथे प्रसूती विकारानेच झाला...( ७ जून १६३१)  या गोष्टीला आपल्याकडे अमर प्रेम , the great love story अस संबो...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

Image
// लोकशाहीर आण्णाभाऊ साठे //         'आण्णाभाऊ साठे' म्हटलं कि आठवते एक लावणी "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली" .       प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवंताला लाभेल हे सांगता येणं कठीण. नाहीतर , वाटेगावाच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला 'अण्णाभाऊ साठे" नावाचा मुलगा ज्याला वयाच्या १५-१६ व्या वर्षापर्यंत धड अक्षर ओळखही झालेली नव्हती ,तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवतो, 'फकिरा' या त्यांच्या बावनकशी कादंबरीची सोळा आवृत्ती निघते, मराठी व्यतिरिक्त भाषाही माहित नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो , आणि त्यांच्या साहित्यकृतींची भाषांतरे भारतीय नव्हे तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात . याचा अर्थ काय लावायचा.?       भाऊ मांगांच्या घरात जन्मलेल्या अण्णांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवले. समाज्याच्या अपेक्षेचे चटके सहन केले, वेठबिगारीतील अमानुष पिळवणूक भोगली, गिरणीकमगारांच्या हलपेष्टा आणि शोषण सोसले आणि झोपडपट्टीतील बकालपणाची सोबतहि केली इतके अपार दुःख सोसलेल्या अण्णांची जिद्द मात्र प्रकर्षाने द...

तळबीडचे मोहिते घराणे

Image
     महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मातब्बर सरदार घराण्यांनी स्वराज्यासाठी मोठी कामगिरी केली. वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचीहि आहुती दिली. आणि अशा मातब्बर सरदारांच्या कामगिरीतून आणि बलिदानातून शिवरायांचे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. तळबीडचे मोहिते घराणेही त्यापैकीच एक. मोहिते हे एक महाराष्ट्रातील प्राचीन हिंदू घराण्यांपैकी एक. हे घराणे मुसलमानी आमदनीमध्ये उदय पावून मराठेशाही मध्ये प्रख्यात झाले. या घराण्यातील हंबीरराव मोहिते हे तर शिवकालीन इतिहासात प्रसिद्धच आहेत. मोहिते घराण्याचा पुष्कळसा इतिहास उपलब्ध नाही आणि आहे तो अगदीच अल्प आहे. ★मोहिते घराण्याचा इतिहास मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण (चौहान) राजांचे वंशज. हिंदुस्थानांत मुसलमान लोकांच्या स्वाऱ्या होऊन दिल्लीचे हिंदू सार्वभौमत्व नष्ट झाल्यानंतर या घराण्याचे वंशज राजपुताण्यांत हाडोती प्रांतात राहिले ;  म्हणून त्यांस हाडे हे नांव पडले. पुढे हे हाडे चव्हाण दिल्लीच्या मुसलमान बादशहांच्या कारकिर्दीत उदयास येऊन त्यांनी आपल्या रानशौर्याने बादशहास संतुष्ट केले त्यामुळे त्यांस बादशहाकडून मोठमोठया कित...

परळीचे प्राचीन शिवमंदिर (समूह)

Image
!!..परळीचे प्राचीन शिव मंदिर..!!        सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' हे प्राचीन गाव आहे. या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी         शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे . त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे . सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे. मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामधील काही आभासी शिल्पे आहे.. मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.      मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे.  त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आण...