वसंतगड :- पौर्णिमा आणि तीन भटके.
वसंतगड भटकंती पौर्णिमेच्या रात्री.
किर्रर्रर्र अंधारी रात्र तीन भटके शिवकाळ अनुभवावा या इच्छेने गडावर भटकत होते, सोबत ना बॅटरी ना मोबाईल फक्त साक्षीला तो चंद्र आणि त्याचा प्रकाश .
त्यातील एक गडकोटांबद्दल बोलतोय, एक इतिहासातील गोष्टी सांगतोय तर एक इतिहासातील कल्पनांमध्ये गुंग.
इतका मोठा गड त्याचा पसाराही तितकाच असणार ना..? मग वेळ तर लागणारच की..
तर गोष्ट अशी,
महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या 'टीम वसंतगड' तर्फे 'वसंतगड किल्ल्यावर' मशाल मोहोत्सव घेण्यात आला , गडावर जणू शिवकाळ अवतरला मशाली घेऊन सर्व गड फिरून झालं आणि मशाल मोहोत्सव संपला.
रात्रीचे 2 वाजले असावेत सगळे झोपी गेले पण 3 जण जागे होते ज्यांना दंगामस्ती करून झोप येत नव्हती. तिघांचं नियोजन ठरलं
आज पौर्णिमा.
रात्रीचा गड फिरायचा..!!
शिवशाहीत मावळे जसे रात्रीचे फिरत तसे गडाच्या तटाबुरुजावरून फिरून मनसोक्त गड फिरू. तोही विना बॅटरी आणि मोबाईल घेता, चंद्र आहे सोबतीला तो दाखवेल तेव्हढं पाहायचं आणि येऊन झोपायचं ठरलं..
तिघेही उठले आणि सुरुवात कुठून करायची तर एकजण म्हणाला,
"गोमुखी दरवाजापासून करूयात..!!"
निघाले...
चंद्रसेन मंदिरापासून निघून "चुन्याचा घाणा" जवळ थोडावेळ थांबून थेट गोमुखी दरवाजाजवळ आले.
"पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचे लखलखीत चांदणे त्या गोमुखी दरवाजावर अक्षरशः चमकत होते. चंद्राच्या शीतल चांदण्यांमध्ये ते तिघे त्या दरवाजाच्या पायरीवर बसून शिवकाळ आठवण्याचा प्रयत्न करू लागले,"
पहिला :- शिवकाळात या दरवाजाजवळ किती राबता असेल ना..??
दुसरा:- होय ,
रात्री इथं खूप कडक पहारा असेल.
पिळदार मिशा असणारे रांगडे मावळे काय दिसत असतील ना..!
तिसरा :- या दरवाजपासून सगळ्या तटबंदीवर रात्रीच्या मशाली कसल्या जबरी दिसत असतील ना..!
(या सर्व तिघांच्या कल्पना बर का..)
तिघं तिथून उठले आणि दरवाजाच्या जवळच असणाऱ्या विशाल बुरुजाजवळ आले. चांदण्याच्या प्रकाशात हळूहळू पायऱ्या चढून दिघेही वर येऊन बसले.
थोडीफार चर्चा करू आणि मग निघू तसेही आपल्याजवळ खूप वेळ आहे असे म्हणून पुन्हा इतिहासात गुंगले..
त्याच वेळी त्यांच्यातील एकाने "जावळीसारख्या प्रचंड अवघड आणि बिकट प्रदेशाच्या जीवावर मिजास करणाऱ्या चंद्रराव मोऱ्याचे शिवाजी महाराजांनी कसे पारिपत्य केले हा प्रसंग सांगितला."
गडावर गार वारा झुळुझुळू वाहत होता ऐन उन्हाळ्यात देखील तिथं थंडी भासत होती.
इतक्यात एकजण म्हटला..
"या बुरुजाने नक्की शिवछत्रपती पाहिलेले असणार किती बरं झालं असतं जर या बुरुजाने आपल्याला त्या गोष्टी सांगितल्या असत्या.."
तोवर दुसरा म्हटला,
"बुरुजाने तर शिवछत्रपती पाहिलेत पण आकाशातील या साक्षीदाराने (चंद्राकडे बोट दाखवत) तर संपूर्ण शिवशाही पहिली आहे. विचार करा जर हा चंद्र बोलू लागला तर.."
तिघे पुन्हा इतिहासात रमून गेले.
शिवछत्रपतींनी मसुरच्या सुल्तानजी जगदाळे ला याच गडाच्या पायथ्याशी आणून मारले, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते याच गडाच्या पायथ्याचे यावरून अनेक वेळ चर्चा रंगली.
त्यांनतर तिघे तिथून निघाले.
तटबंदीवरुन चालत चालत अनेक विषयांवर ते तिघे बोलत होते.
मुख्य विषय जरी शिवशाही असला तरी अनेक वेगवेगळे विषय ओघाने येतच होते.
अचानक खसखस असा आवाज यायचा आणि झाडीतून एखादा ससा टूनूटूनु उद्या मारत झाडीत गुडूप व्हायचा(या सशाला बघून भुतांचा विषय पण निघाला.), मोठ्या शिंगांच्या गाईंचे कळप गडावर फिरताना दिसत होते.
आपल्यामुळे कुणाला त्रास नको आणि शिवकाळातील मावळे पहारा कसे देत असतील याचा अनुभव यावा म्हणून ते तिघे केवळ तटबंदीवरूनच चालत होते.
तिघे चालत चालत बुरुजांवर जात होते प्रत्येक बुरुजावर थोडं बसून परत तटबंदीवर चालत पुढे जायचे दहा पंधरा मिनिटे चर्चा आणि अचानक तिघे शांत होऊन गडावरच्या कीटकांचे प्राण्यांचे , स्वतःच्या श्वासांचे आवाज ऐकत चालायचे. मधून एकजण म्हणायचा " असं रात्रीचं बोलून आपण गडाची शांतता नाही ना भंग करत..?"
यावर दुसरा म्हणायचा,
"नाय रे, उलट गडाला शांततेचा कंटाळा आला असेल एकेकाळी इतका राबता असलेला गड कित्येक रात्री एकांतच भोगतोय त्यामुळे 3 पोरं इतक्या रात्री त्याच्या अंगाखांद्यावर फिरत आहेत याने त्याला गुदगुल्या होत असतील."
(या वाक्यावर तिघांना उगाचच स्वतःचा अभिमान वगैरे वाटू लागला.)
तटबंदीवर चालत चालत दिसणारे बरेचसे अवशेष त्या तिघांनी पाहिले आणि आता बास करू आणि झोपायला जाऊ या उद्देशानं तिघं एके ठिकाणी बसले.
"रायगड आणि राजगड सारख्या दुर्गांवर रात्री भटकणारे कितीतरी लोकं असतील पण वसंतगडावर इतक्या रात्री एखाद्या पहारेकऱ्यांच्या प्रमाणे तटबंदीवर फिरणारे कितीजण असतील ओ.."
कदाचित आपणच पाहिले असा विचार तिघांच्याही मनात आले.
(परत उगीचच स्वतःचा अभिमान वगैरे त्यांना वाटला.)
तिघे तिथून उठले आणि परत मंदिरात आले . पहाटेचे 3 वाजले होते. टाकलेल्या चटईवर शांत चित्ताने पडून राहिले, क्षणभर आपण घेतलेला अनुभव आठवू लागले आणि हवेतील गारवा वाढत चालल्यामुळे अंगावर चादर घेऊन झोपी गेले..
अंधाऱ्या रात्री पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने , हवेतील गारवा अनुभवत , मंद वाहणाऱ्या झुळझुळ वाऱ्यासोबत तीन सोबती वसंतगड या दुर्गावर भटकले, हे करून त्यांना काय मिळाले ओ.??
आयुष्यातील कधीही न विसरणारा अनुभव , आपण थोडेफार का होईना त्या शिवछत्रपतींच्या मावळ्यांचे पाईक आहोत हे विचार त्यांना मिळाले आणि त्याहीपेक्षा प्रचंड ऊर्जा मिळाली जी इतर कशातूनही मिळाली नसती..!!
तर हे तिघे आहेत अर्जुनराव जाधव, सनी देशमुख आणि मी (संतोष तुपे).
-: काही विशेष कारणाने नामोल्लेख टाळला आहे आणि लेखनसीमा असल्याने आणि वाचताना रटाळ वाटू नये या कारणाने आटोपशीर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
लेकरांचे अगत्य असू द्यावे..!!
✍🏻 लेखन
- संतोष अशोक तुपे.
#इतिहासमार्ग
(मध्यरात्र असल्याने फोटो काढले नाहीत पण 'टीम वसंतगड' आयोजित मशाल महोत्सवाचे फोटो इथं देत आहे )

वचताना पुन्हा एकदा त्या क्षणाची आठवण झाली
ReplyDelete