हंबीरराव मोहिते यांची तलवार


!!..हंबीरराव मोहिते यांची तलवार..!!
       समज - गैरसमज

समज -

      अनेक दिवसांपासून ( खरंतर महिन्यांपासून ) सोशल मीडियावर एका तलवारीचा फोटो फिरतोय आणि त्यासोबत एक पोस्ट फिरत आहे की " ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार याच तलवारीने त्यांनी प्रतापगड च्या युद्धात ३०० शत्रू मारले म्हणून यावर ३ शिक्के कोरलेले आहेत"  सदरची तलवार पाहिल्यावर कोणीही सांगेल की ती बनावट आहे , अशी कोणतीही तलवार उपलब्ध नसून या फोटोतील तलवार ( चित्र क्र.१ ) बनावट आहे.



गैरसमज.-

        प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरात एक मराठा मुठीची धोप तलवार ठेवलेली आहे.
जनमानसात असा समज आहे की ती तलवार ' सरसेनापती हंबीरराव मोहिते ' यांची आहे पण माझ्या मते तो एक गैरसमज आहे . ती तलवार हंबीरराव मोहिते यांची नाही.
       भवानी मातेच्या मंदिरातील त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हंबीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हंबीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक विराची आहे.



दुर्दैवाने हंबीरराव मोहिते यांची तलवार सध्यातरी उपलब्ध नाही.

- संतोष अशोक तुपे.

#hambiraravmohite #Talwar  #pratapgad #samaj_gairsamaj

Comments

  1. सेनापती चे वंशज आहेतका

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मराठा लष्कर

तळबीडचे मोहिते घराणे