शिवरायांची धार्मिकता


जय शिवराय

हिंदुधर्माभिमानी शिवराय

शिवराय हे हिंदूधर्माभिमानी होते काय .....????

शंका वाटतेय....??
बर पुढील मुद्दे वाचा..



🌑 शिवरायांची धार्मिकता आणि देवस्थानांना केलेली मदत

 १. दादाजी नरसप्रभु आणि शिवरायांनी रायरेश्वराच्या पुजेअर्चेची व्यवस्था केली
(२६ मे १६४२)

२. पुण्यात आल्यावर शिवरायांनी आणि आईसाहेबानी एक गणपतीचे मंदिर बांधले त्यास नंदादीप दिला.(१९ मार्च १६४६) तोच पुण्याच्या प्रसिद्ध कसब्याचा गणपती.

३. दादाजी नरसप्रभु देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात राजे म्हणतात...--
               
श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रिलगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करुण पुरविणार आहे.

४. सभासद बखर सांगते -  मुलूखांत देवदेवस्थाने जागजागा होती त्यास दिवाबत्ती , नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. वैदिक ब्राम्हण यांसी योगक्षेम, ब्राम्हण विद्यावंत, वेदशास्त्रसंपन्न, ज्योतिषी, अनुष्ठानी, तपस्वी गावोगावी सत्पुरुष पाहून त्यांचे कुटुंब पाहून अन्नवस्त्र ज्यास लागेल त्याप्रमाणे धान्य द्रव्य त्यांस द्यावे.

५. रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात महाराज आज्ञा देतात- धर्मार्थ भूमिदान देण्याचे पुण्य अनंत आहे. जो श्रोत्री कुटुंबवत्सल, वेदशास्त्रसंपन्न अनुत्पन्न ज्यानी घर सोडून भिक्षेस जातां ज्यांचा कर्मलोप होतो , यैसे सदब्राम्हण पाहून पर्वादी पुण्यकाळी अथवा महाक्षेत्री सदक्षणिक धारादत्ते ग्राम अथवा भूमि देणे.तैसीच थोर थोर जागृत देवस्थाने , सत्पुरुषांचे मठ, समाधी स्थाने जेथे पूजा नैवेद्य यात्रा आदि अन्नशांती नियमित आहे यैसे स्थळीही ग्राम अथवा भूमी देणे ते द्यावी.

६. चाफळ श्री उत्सवास प्रतिवर्षी दोनशे होन दिले व पुढे महाराजानी चाफळच्या श्री मंदिराच्या संरक्षणासाठी आणि शोभा सवर्धनासाठी पाचशे होन पाठवले.

🌑 शिवरायांचे साधूसंतांबद्दल भाव त्यांना केलेली मदत..

१. महाराज सर्व सत्पुरुषांचा आदर करत असत त्यात समर्थ रामदास स्वामींबद्दल त्यांना नितांत आदर वाटे ..

चाफळच्या यात्रा महोत्सवात विजापुरी सैनिक उपद्रव करतात अशी बातमी महाराजांना लागली म्हणून महाराजांनी दत्तजीपंतांना आज्ञापत्र लिहिले की "श्रीच्या यात्रेत सैनिकांचा किंवा मुसलमानांचा उपद्रव होणार नाही याची खबरदारी घ्यावी व रामदास गोसावी व देवासाठी जे ब्राम्हण तेथे येऊन राहतात यांचा परामर्श घ्यावा " (पत्राची तारीख ९ ऑगस्ट १६७२)

समर्थांची वृद्धावस्था व प्रकृतिमान लक्षात घेऊन राजेनी सज्जनगड त्यांना वास्तव्यास दिला.

समर्थांप्रमाणे महाराजांनी चिंचवडकर नारायणदेव, मुदगलगावकर देवभारती, गोपाळभट महाबळेश्वरकर, स्वानंदस्वामी, देहुकर तुकारामबुवांचे पुत्र महादोबा वैगेरे कितीतरी सत्पुरुषांचा आदरसत्कार केला. तसेच श्रीज्ञानेश्वर, श्रीसोपानदेव वैगेरे महापुरुषांच्या समाधी मंदिरांची त्यानी बूज ठेवली.

🌑 कवि आणि विद्वानाना दिलेले आश्रय..

१. महाराजांच्या चरित्रावर लुब्ध होऊन कवी भूषण नावाचा महाकवि दक्षिणेत आला त्याने महाराजांवर शिवराज भूषण हा काव्य ग्रंथ रचला.

२. महाराजांच्या यशोगंधाने मोहित होऊन तंजावरचा जयरामकवी सारखा बारा भाषांचा तज्ञ त्यांच्या दर्शनासाठी आला. त्याने महाराजांची यशोगीते विविध भाषेत गायिली.

३. समर्थ रामदासांसारखे तत्वज्ञ महर्षी त्यांच्या देवाकार्यावर सादर संतुष्ट झाले.

४. कवी परमानंद सारखा कवी त्यांच्या पदरी होता त्यांनी तर राजांचे चरित्र शिवभारत या ग्रंथामधे संस्कृत मधे लिहिले.

५. काशीचे एक महापंडित वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट महाराजांच्या भेटिस आले.
याच गागाभट्टानी महाराजांचा राज्याभिषेक केला.

🌑 राज्यव्यवहार कोशाचि निर्मिति

१. महाराजांनी अष्टप्रधानांची फारसी नावे बदलून त्यांना संस्कृत नावे दिली. आणि राज्यकारभारतील रूढ झालेले शेकडो फारसी शब्द काढून टाकून संस्कृत प्रतिशब्द देण्याचे निश्चित केले.
पंडित रघुनाथपंतांस त्यानी आज्ञा देऊन राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. यावरून समजते की शिवराय स्वधर्म अभिमानी तर होतेच पण भाषेचा ही त्यांना अभिमान होता.

🌑 महाराजांनी जे गड बांधले तिथे मंदिरे उभारली जसे प्रतापगडावर श्री तुळजा भवानी आणि रायगड येथे श्री जगदीश्वर..

२. पंचगंगा नदीच्या तिरावर महाराजांना अतिप्राचीन  श्रीसप्तकोटीश्वराचे उध्वस्त मंदिर दिसले.
महाराजांनी ठरविले श्रींचे मंदिर बांधायचे आणि शके १५९० कार्तिक वाद्य ५ शुक्रवार रोजी बांधकाम सुरु झाले..
मंदिराच्या महाद्वारावर एक शिलालेख खोदला तो असा ..
 'श्रीसप्तकोटिश शके१५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण
पंचम्यां सोमे शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभः ।।
खोदताना एक चूक झाली शुक्रवार ऐवजी सोमवार घातला गेला आहे..

🌑 औरंगजेबाने नेताजी पालकर याचे हालहाल करुन त्यांना मुसलमान केले जेव्हा नेताजी परत स्वराज्यात आले तेव्हा शिवरायांनी परत त्यांचे शुद्धिकरण केले आणि परत स्वधर्मात घेतले.
यावरून समजते महाराज धर्माभिमानी होते अर्थात हिंदुत्ववादीहोते..

समर्थांच्या शिवरायांना दिलेल्या पत्रात त्यानी केलेल्या कार्याबद्दल समर्थ लिहितात...

या भूमंडळीचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे

- संतोष अशोक तुपे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

Comments

Popular posts from this blog

हंबीरराव मोहिते यांची तलवार

तळबीडचे मोहिते घराणे

!! श्रीराम मंदिर , चाफळ !!