शिवरायांचे सरसेनापती
🚩जय शिवराय
निर्मिले स्वराज्य हिंदवी //
लाजले कि शशिरवि //
प्रतिपच्चंद्र लेखवि //
किर्ति ऐसी जाहली//
केवळ नूतन सृष्टी निर्माण करनारे छत्रपती शिवाजी महाराज हे आणि या नूतन सृष्टीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करनारे त्यांचें शूर" सरसेनापती" यांविषयी सर्वांच्याच मनात आदराचे स्थान आहे .
शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रभाव हिंदुस्थानातील सर्वांच्या मनावर आहे अशा छत्रपती शिवाजी महराजांनी ..... " ज्या ज्या उपाये शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करुन साल्हेरी - अहिवंतापासुन चंदि- कावेरी तिरपर्यंत निष्कटक राज्य; शतावधि कोटकिल्ले , तैसिच जलदुर्गे व कितेक विषम स्थळे हस्तगत केली....." दिगंतिविख्यात कीर्ती संपादिली. लोकसंग्रह केला. मातृभूमीचे संरक्षण हे परम कर्तव्य मानले. सर्व ज्ञातीने कष्ट करुन शत्रूचा पराभव करावा यासाठी गनिमी काव्याचे युद्धतंत्र विकसित केले आणि यासाठी झुंजार सेनापतीचि पारख करून त्यांना कामी लावले. माणकोजी दहातोंडे नंतर नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि त्यानंतर हंबीरराव मोहिते असे झुंजार सरसेनापती उभे केले.
मिर्झा राजा जयसिंग, दिलेरखान आणी शिवाजी महाराज यांचा तह झालेला असता महाराज जयसिंगाची अनुमती घेउन पन्हाळ्यावर चालून गेले,पौष वद्य षष्ठी म्हणजेच १६जानेवारी १६६६, त्यावेळी सेनापती नेतोजी यांना महाराजांनी " समयास कैसा पावला नाही" असा बोल लाविला, व नाराजीने नेतोजी शत्रू पक्षास सामिल झाले.
त्यानंतर कुडतोजी गुजर हे " प्रतापराव" या पदवीने सेनापती झाले. त्यानी बहलोलखान प्रसंगी त्यास अभय दिले व महाराजांची त्यांच्यावर गैरमर्जी झाली. महाराज त्यांना बोलले व त्यामुळे ते इर्शेने नेसरिच्या खिंडीत आपल्या सहा सहकाऱ्याच्या सहय्याने बहलोलच्या सैन्यावर तुटून पडले त्यात त्यांना वीरमरण आले (माघी शिवरात्र,२४फेब्रुवारी १६७४)
यानंतर नवीन सेनापतीची नेमणूक करणे गरजेचे होते . महाराज चिपळूण येथे छावणीची पहानी करावयास गेले असता "सरनोबतीस माणूस पाहता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता. बरा ,शहाणा,मर्दाना, सबुरीचा,चौकस शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास ' हंबीरराव' किताबती देउन सरनोबती सांगितली ( मे १६७४)
महाराजांच्या सोबत हंबीररावानी अनेक मोहिमांत पराक्रम गाजवला आणि महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी पंतप्रधान आणि युवराज यांची श्रेणी आणि मानसन्मान त्यांना प्राप्त झाला. हंबीरराव मराठ्यांच्या इतिहासात म्हणजेच शिवराय आणि शंभूराजे यांच्या कारकिर्दीत सुमारे २१वर्षे सरलष्कर म्हणून कार्यरत होते. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ते १६८७ पर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.१६८७ मध्ये झालेल्या वाईच्या लढाईत सर्जाखान विरूध्द त्यांना वीरमरण आले. त्या लढाईची सविस्तर हकीकत उपलब्ध नाही आणि त्यांच्या मृत्यूची तारिखहि कोठेही नोंदविली गेली नाही. वाईजवळ कडेगांव या गावी हि लढाई झाल्याचे समजते. हि लढाई दसऱ्याच्या पूर्वी केव्हातरी झाली असावी असे समजते . ॲर्वाचिन चरित्र कोशानुसार डिसेंबर मधे ..
हंबीरराव यानी स्वराज्याचा विस्तार करण्याचे काम शिवछत्रपतींच्या काळात केले. आणि संभाजी राजांच्या कारकिर्दीत हे स्वराज्य वाचवण्यासाठी प्राणर्पन केले. आपल्या पराक्रमाद्वारे मराठ्यांच्या इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण केले यात शंकाच नाही.
हंबीरराव यांच्याबद्दल अनेक नोंदी अज्ञात आहेत काही नोंदी अस्सल आहेत त्या नोंदिंचा उपयोग करून हंबीरराव मोहिते यांची माहिती देण्याचा प्रयत्न करनार आहे ....
अगत्य असु द्यावे......!!!
जय भवानी
हर हर महादेव
जगदंब..! जगदंब...!! जगदंब....!!!
- संतोष अशोक तुपे
Www.facebook.com/santosh.tupe.33

Comments
Post a Comment