Posts

Showing posts from July, 2017

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

Image
// लोकशाहीर आण्णाभाऊ साठे //         'आण्णाभाऊ साठे' म्हटलं कि आठवते एक लावणी "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली" .       प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवंताला लाभेल हे सांगता येणं कठीण. नाहीतर , वाटेगावाच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला 'अण्णाभाऊ साठे" नावाचा मुलगा ज्याला वयाच्या १५-१६ व्या वर्षापर्यंत धड अक्षर ओळखही झालेली नव्हती ,तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवतो, 'फकिरा' या त्यांच्या बावनकशी कादंबरीची सोळा आवृत्ती निघते, मराठी व्यतिरिक्त भाषाही माहित नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो , आणि त्यांच्या साहित्यकृतींची भाषांतरे भारतीय नव्हे तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात . याचा अर्थ काय लावायचा.?       भाऊ मांगांच्या घरात जन्मलेल्या अण्णांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवले. समाज्याच्या अपेक्षेचे चटके सहन केले, वेठबिगारीतील अमानुष पिळवणूक भोगली, गिरणीकमगारांच्या हलपेष्टा आणि शोषण सोसले आणि झोपडपट्टीतील बकालपणाची सोबतहि केली इतके अपार दुःख सोसलेल्या अण्णांची जिद्द मात्र प्रकर्षाने दिसून येते. लोकशाही

तळबीडचे मोहिते घराणे

Image
     महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मातब्बर सरदार घराण्यांनी स्वराज्यासाठी मोठी कामगिरी केली. वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचीहि आहुती दिली. आणि अशा मातब्बर सरदारांच्या कामगिरीतून आणि बलिदानातून शिवरायांचे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. तळबीडचे मोहिते घराणेही त्यापैकीच एक. मोहिते हे एक महाराष्ट्रातील प्राचीन हिंदू घराण्यांपैकी एक. हे घराणे मुसलमानी आमदनीमध्ये उदय पावून मराठेशाही मध्ये प्रख्यात झाले. या घराण्यातील हंबीरराव मोहिते हे तर शिवकालीन इतिहासात प्रसिद्धच आहेत. मोहिते घराण्याचा पुष्कळसा इतिहास उपलब्ध नाही आणि आहे तो अगदीच अल्प आहे. ★मोहिते घराण्याचा इतिहास मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण (चौहान) राजांचे वंशज. हिंदुस्थानांत मुसलमान लोकांच्या स्वाऱ्या होऊन दिल्लीचे हिंदू सार्वभौमत्व नष्ट झाल्यानंतर या घराण्याचे वंशज राजपुताण्यांत हाडोती प्रांतात राहिले ;  म्हणून त्यांस हाडे हे नांव पडले. पुढे हे हाडे चव्हाण दिल्लीच्या मुसलमान बादशहांच्या कारकिर्दीत उदयास येऊन त्यांनी आपल्या रानशौर्याने बादशहास संतुष्ट केले त्यामुळे त्यांस बादशहाकडून मोठमोठया किताबती व राजचिन्हे मि

परळीचे प्राचीन शिवमंदिर (समूह)

Image
!!..परळीचे प्राचीन शिव मंदिर..!!        सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' हे प्राचीन गाव आहे. या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी         शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे . त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे . सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे. मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामधील काही आभासी शिल्पे आहे.. मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.      मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे.  त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था दाखवणारी ही प