!!. सौदामिनी .!!

!!. सौदामिनी .!!


आधीच धुमसत होते अंतर, त्यातच ठिणगी पडली जशी;
सुरुंग उडला जसा निघाला सहा शिपायांनिशी. -१

राव इरेचा असा, पेटता डोंबच त्याच्या मनी,
कडकडत्या खडगात नाचती तृषर्त सौदामिनी. -२

सुर्यरथाचे अश्व निखळले आले पृथ्वीवरी,
चौखुर उधळत धरणी विंधीत गेले वार्‍यावरी. -३

शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी,
काळोखाच्या छाताडावर थै थै नर्तन करी. -४

सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा धीर,
वीर न वेडे पीर निघाले सात शीवाचे तीर. -५

- श्री.शिरीष गोपाळ देशपांडे.




तव शौर्याचा एक अंश दे ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे ! 
तव तेजांतिल एक किरण दे ! जीवनांतला एकच क्षण दे ! 
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ! पुसू पानिपत ! 
पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !!
"राजवंदना"

- बाबासाहेब पुरंदरे

Comments

Popular posts from this blog

हंबीरराव मोहिते यांची तलवार

तळबीडचे मोहिते घराणे

मराठा लष्कर