Posts

Showing posts from May, 2018

वसंतगड :- पौर्णिमा आणि तीन भटके.

Image
वसंतगड भटकंती पौर्णिमेच्या रात्री.      किर्रर्रर्र अंधारी रात्र तीन भटके शिवकाळ अनुभवावा या इच्छेने गडावर भटकत होते, सोबत ना बॅटरी ना मोबाईल फक्त साक्षीला तो चंद्र आणि त्याचा प्रकाश . त्यातील एक गडकोटांबद्दल बोलतोय, एक इतिहासातील गोष्टी सांगतोय तर एक इतिहासातील कल्पनांमध्ये गुंग. इतका मोठा गड त्याचा पसाराही तितकाच असणार ना..? मग वेळ तर लागणारच की.. तर गोष्ट अशी,          महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या 'टीम वसंतगड' तर्फे 'वसंतगड किल्ल्यावर' मशाल मोहोत्सव घेण्यात आला , गडावर जणू शिवकाळ अवतरला मशाली घेऊन सर्व गड फिरून झालं आणि मशाल मोहोत्सव संपला. रात्रीचे 2 वाजले असावेत सगळे झोपी गेले पण 3 जण जागे होते ज्यांना दंगामस्ती करून झोप येत नव्हती. तिघांचं नियोजन ठरलं  आज पौर्णिमा. रात्रीचा गड फिरायचा..!! शिवशाहीत मावळे जसे रात्रीचे फिरत तसे गडाच्या तटाबुरुजावरून फिरून मनसोक्त  गड फिरू. तोही विना बॅटरी आणि मोबाईल घेता, चंद्र आहे सोबतीला तो दाखवेल तेव्हढं पाहायचं आणि येऊन झोपायचं ठरलं..          तिघेही उठले आणि सुरुवात कुठून करायची तर एकजण म्हणाला, "गोमुखी