स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेधे





!! वतन साहेबाच्या पायावरी ठेवले !!

      अफजलखान स्वारीच्या वेळी कान्होजी नाईक जेधे यांना मावळच्या देशमुखबराबरी फर्मान आले होते ते फर्मान घेऊन आपल्या पाच पुत्रांसोबत शिवाजी राजेंकडे राजगड येथे गेले आणि त्यांना फर्मान दाखवले तेव्हा शिवाजीराजे म्हणाले की,

      "तुमचे शेजारी केदारजी व खंडोजी खोपडे देशमुख ताा उत्रोली हे अफजलखानाकडे गेले. तुम्ही पातशाही हुकूम मोडून राहिले म्हणजे वतनास अपाये होईल. जिवावरी गोष्ट येऊन संकट पडले, याकरिता तुम्हीही जाणे."

त्यावरी कान्होजी नाईक बोलिले की,
      महाराजांनी आपली क्रिया घेऊन तुमचे हाती दिली तेच क्रिया  व इमान आपला शाबूत आहे . 'वतन साहेबाच्या पायावरी ठेविले.' आपण व आपले लेक साहेबाच्या पुढे खस्त होऊन तेव्हा जे होणे तें होईल.
कान्होजी नाईक ऐसे बोलून शपथ केली. त्यावरी राजश्री स्वामी बोलिले की , हातावरी पाणी घेऊन वतनास घालणे. आग्येप्रमाणे वतनास हातावरी पाणी घेऊन सोडिले.

संदर्भ - जेधे शकावली.
चित्र- गुगलवरून

●संतोष अशोक तुपे

#अजरामर_उद्गार
#इतिहासाच्या_पाऊलखुणा

Comments

Popular posts from this blog

मराठा लष्कर

तळबीडचे मोहिते घराणे

हंबीरराव मोहिते यांची तलवार