श्री समर्थ रामदास स्वामी


हा लेख मी मार्च 2015 मध्ये लिहिला होता त्यामुळे काही त्रुटी असण्याची शक्यता आहे.
चूक भूल देणे घेणे.._/\_



जय श्री राम
श्री राम समर्थ

आज राम नवमी सर्वाना हार्दिक शुभेच्या....

तसेच श्री रामचंद्राचे परम भक्त श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्मदिवस.

 त्यानिमित्त समर्थां विषयी थोड़ी माहिती.....

श्री समर्थांचे मूळ नाव नारायण ठोसर-कुलकर्णी.
त्रिम्बकपंत हे त्यांचे आजोबा व सूर्याजीपंत हे वडील सदैव परमेश्वर भक्तित निमग्न असत.
अशा थोर कुळात श्री सूर्यनारायनाने अंशेकरुन

 सौ. राणुबाई पोटि शके १५३०
 मधे चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी
किलक नाम सवत्सर या शुभ दिनी मध्यानकाली जांब येथे समर्थ यांच्या रूपाने अवतार धारण केला ...

पुढे समर्थांनी कृष्णतीरी
राहून जग उद्धार व धर्मसंस्थापना  केली आणि ठोसर कूल पावन केले .
समर्थानी सारा महाराष्ट्र देश पावन केला आणि सनातन वैदिक धर्माची ध्वजा अखिल भरतखंडात फडकवली....

"राघवाचा दास मी झालो पावन ।।
पतित तो कोण उरो शके"  ।।
या दुर्दम्य धड़ाडीने श्री समर्थानी जगावर लिलानुग्रह केला ....

समर्थानि आपल्या जीवनात अनेक थोर कामे केलि मग त्यानी स्थापन केलेले  अकरा मारुती असो किंवा दासबोध सारखा प्रभावी ग्रंथ असो सर्वातच त्यांचे विचार दिसून येतात ...

याच श्री समर्थाना शिवराय पूज्य मानत आणि समर्थानी सुद्धा आपल्या पत्रात शिवरायांचा उल्लेख

।।निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु।।

।।अखंड स्थितिचा निर्धारु । श्रीमंतयोगी ।।

असा केला आहे...

शिवराय परलोकवासी झाल्यापासून त्याना स्वराज्याची चिंता लागली होती समर्थांचे अंतःकरण तीळ तीळ तुटत होते म्हणून त्यांनी संभाजी राजेना पत्र लिहिले त्याचे अस्सल पुरावे आजही उपलब्ध् आहेत..

श्री समर्था विषयी जेवढ लिहाव तेवध थोड आहे ....

आपले इहलोकीचे  वास्तव्य संपत आले आहे ऎसे जेव्हा त्यांना वाटु लागले तेव्हा त्यानी हा उपदेश केला ..

माझी काया गेली खरे । परी मी आहे जगदाकारे ।
ऐका स्वहित उत्तरे । सांगेन मी।।१।।

नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ।
तेणे सयुज्याची वाट । ठायी पडे ।।२।।

रहा देहाच्या विसरे । वार्तु नका वाईट बरे ।
तेणे मुक्तीचीही द्वारे ।  चिजविती।।३।।

रामी रामदास म्हणे । सदा स्वरूपी अनुसंधान ।
करा  श्रीरामाचे ध्यान । निरंतर ।।४।।

अशा रामसूर्यपुत्राने शके १६०४ माघ वाद्य नवमी ला सज्जनगड येथे देहत्याग केला......

🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩

-संतोष तुपे

Comments

Popular posts from this blog

हंबीरराव मोहिते यांची तलवार

तळबीडचे मोहिते घराणे

!! श्रीराम मंदिर , चाफळ !!