ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे काय..??
..शहाजहान आणि मुमताजचे अमर प्रेम.. (कि विकृत प्रेम )
मोगल बादशहा खुर्रम उर्फ शहाजहान आणि त्याची बायको 'मुमताजमहाल' यांच्या प्रेमाचे आपल्याकडे दाखले दिले जातात.
अमर प्रेम वगैरे उपमा दिल्या जातात .
" प्यार होतो शहाजहान जैसा हो, जिसने अपने प्यार के लिये ताजमहल बनवाया " असे डायलॉग आपल्याकडे सिनेमातून तर येतच असतात.
पण हे नक्की प्रेम आहे का ?
इतिहास काय म्हणतो हे आपण पाहू.
शहाजहान आणि मुमताजचे लग्न झाल्यापासून मुमताज वीस वर्षे जगली.
शहाजहानाचे मुमताज वर इतकं प्रेम (?) होतं कि या वीस वर्षात मुमताजला चौदा अपत्ये झाली. त्यामधील पहिली सहा मुले तिला इ. स. १६१३ ते १६१८ अशी सलग सहा वर्षे झाली ( प्रत्येक वर्षी एक )
या चौदामधील आठ मुलगे आणि सहा मुली होत्या , या सततच्या प्रसूतीमुळे त्यापैकी आठ अपत्ये लहानपणीच मरण पावली.
आणि एवढं झाल्यानंतर व्हायचं तेच झालं मुमताजचा मृत्यू तेरा वेळा प्रसूत झाल्यानंतर चौदाव्या खेपेस बुऱ्हाणपूर येथे प्रसूती विकारानेच झाला...( ७ जून १६३१)
या गोष्टीला आपल्याकडे अमर प्रेम , the great love story अस संबोधलं जातं..
ताजमहाल समंधी एक आख्यायिका ऐकण्यात आहे कि " ताजमहाल मध्ये अजूनही मुमताज रडते आणि तिचे अश्रू तिच्या कबरीवर पडतात " हे जर खरं असेल बरोबरच आहे.
अहो वैवाहिक जीवनातील सगळी वर्षे बाळंतपणात आणि प्रसूतिवेदना सोसण्यात गेल्यावर तिने रडायचं नाही तर काय हसायचं..??
संदर्भ - मुसलमानी रियासत
संकलन-
संतोष अशोक तुपे
#शहाजहान #मुमताज #मुसलमानी_रियासत #ताजमहाल #अमर_प्रेम

Comments
Post a Comment