मराठा लष्कर








|| श्री मल्हारीमार्तण्ड ||

   लष्कर हे राज्याचे बळ असते. लष्करी प्राविण्यास माणसामधे शिस्तीची गरज असते आणि त्यांच्या नेतृत्वास सामान्य ज्ञानाची आणि प्रचंड कल्पनाशक्तीची गरज असते. या सर्व गोष्टींसोबत हवी असते निष्ठा आणि एक प्रकारची राष्ट्रीय वृत्ती.

     देवगिरीच्या रामदेवराय यादवाचे स्वतंत्र राज्य प्रचंड सेनादल असतानाही अल्लाउद्दीन खिलाजीच्या लहान सेनेने जिंकून घेतले. पुढे त्याच्या मुलाने आणि जावयाने पारतंत्र्याचे जोखड उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ...!!
सेनादल असतानाही हरण्याचे कारण होते सेनेची निष्ठा ही केवळ राजापुरती मर्यादित होती . संपूर्ण राज्यासाठी नव्हती . त्यानंतर अनेक शतके मराठ्यांना स्वातंत्र्य पाहता आले नाही.

       पण मधल्या काळात मराठे गप्प नव्हते . ते लढत होते , झुंजत होते , रक्तपात करत होते .
पण ते लढत होते परकीय सत्तेसाठी आणि तेही स्वकीयांविरुद्ध .
तेहि वतनासाठी .
त्यांच्याजवळ राष्ट्रिय वृत्ती नव्हती असे नाही पण त्यांच्यातील राष्ट्रिय वृत्तीची कल्पना अजुन  निर्माण झाली नव्हती.

        पुढे शहाजी राजेंसारख्या शूर , कर्तबगार सेनानायकाच्या पोटी जन्मलेल्या शिवाजी राजेंनी निष्ठावंत मरहट्टे सैनिक जमवून हिंदुस्थानात पाय
रोवून बसलेल्या परकीय इस्लामी सत्तेविरुद्ध लढा उभा केला . मराठ्यांमधे स्वातंत्र्याची भावना जागृत केली . उत्तम असे मराठा लष्कर उभे केले.
" ज्या ज्या उपाये शत्रू आकळावा तो - तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करुण साल्हेरी अहिवंतापासून चंदी कावेरी तिरापर्यंत निष्कंटक राज्य,शतावधी कोटकिल्ले तैसिच जलदुर्गे व कित्येक विषमस्थळे हस्तगत केली.."

आणि रायगडावर हिंदूंचे स्वतंत्र सिंहासन स्थापन केले. स्वतंत्र 'स्व'राज्य निर्माण केले.

      शिवाजी महाराजांच्या लष्कराबद्दल प्रख्यात बंगाली इतिहासकार ' डॉ सुरेंद्रनाथ सेन ' लिहितात,

   " A born military leader shivaji recognise early the supreme need of unity of command in the battle - field & he attained by establishing a regular cadre of officers both for infantry cavalry. "

      अशा  या मराठा लष्कराने शिवाजी महाराजानंतर संभाजी राजेंच्या बाजूने मोगली सैन्याबरोबर मोठी झुंज दिली . इतकी की खासा मोगल बादशाह औरंगजेब  दख्खन काबीज करण्याच्या उद्देशाने मराठ्यांवर चालून आला पण राज्य तर सोडाच पण एखादा किल्लाही त्याला सहजासहजी मिळवता आला नाही.
आणि याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाला गाडून घ्यावे लागले.

या सर्व गोष्टी पाहता शिवाजी महाराजांनी लष्करामधे स्वराज्यनिष्ठा किती खोलवर रुजवली होती याचा प्रत्यय येतो..

#महाराष्ट्रधर्म

    जरी शिरे तुटोनी पडते..
        शिवरायांची आज्ञा ती..
              रणी कबंध पाळीत असती..
                   स्पृहणीय राजभक्तीचा..
                         एक काळ ऐसा होता...!!

-- © संतोष अशोक तुपे


Comments

  1. Best Baccarat Strategy for Beginners - Worrione
    Learn หาเงินออนไลน์ how to beat the game at Baccarat in 2021 at Worrione. Learn how to beat 카지노사이트 the game and find the best casino 바카라 bonus codes for beginners.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तळबीडचे मोहिते घराणे

हंबीरराव मोहिते यांची तलवार