"शिवराय गोब्राम्हणप्रतिपालकच"






"गोब्राह्मणप्रतिपालक शिवराय "

नरहर कुरुंदकर यांच्या व्याख्यानातून...

      ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणांना नोकऱ्या देणं अशी अनेकांची समजूत आहे . पण तस काही नाहीये कारण ब्राह्मण हा वेदांचा अभ्यासक असला पाहिजे , हा वेदांचा अभ्यासक असलेला ब्राह्मण जर धार्मिक कृत्ये करतो , या धर्मकृत्यांचे संरक्षण आणि त्याचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी नोकऱ्या , व्यापार आणि जीवनाच्या सगळ्याच नाड्या आखडून धरण्याची परवानगी म्हणजे ' ब्राह्मणप्रतिपालक'.

         'गोब्राह्मणप्रतिपालक' यातील गो म्हणजे गाय नावाचं जनावर नव्हे हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे.
गो हे हिंदू धर्माच्या अभिमानच प्रतीक आहे.
उदा. राष्ट्रध्वज हा चिंध्यांचा तुकडाच असतो, त्यात एक तांबडा कापड असतो ,एक पांढरा कपडा असतो आणि एक हिरवा कपडा शिवलेला असतो.
पण ज्यादिवशी तो सगळ्या राष्ट्राच्या वैभवाचं प्रतीक म्हणून उभा राहतो त्या दिवशी तो राष्ट्रध्वज उभा कि आडवा , खाली का वर हा जगण्या मारण्याचा प्रश्न होऊन जातो.

      हे जे गाई नावाचं जनावर आहे दोन शिंगांचं हे जोपर्यंत जनावर म्हणून आहे तोपर्यंत ठीक पण ज्यादिवशी ते हिंदूंच्या संपूर्ण पुज्यतेच प्रतीक होऊन जातो त्या क्षणी एक जनावराच्या पाठोपाठ शे- पन्नास मानवी हत्या समर्थनीय मानल्या जातात.
 
         आपण गोब्राह्मणप्रतिपालक म्हणतो त्यावेळेला वेद , गाई आणि ब्राह्मण हे तीन हिंदू धर्माची प्रतीकं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.
' गोब्राह्मणप्रतिपालक ' याचा अर्थ ' हिंदूधर्मसंरक्षक' असा आहे.


लेखन-
संतोष अशोक तुपे

Comments

Popular posts from this blog

हंबीरराव मोहिते यांची तलवार

तळबीडचे मोहिते घराणे

!! श्रीराम मंदिर , चाफळ !!