Posts

Showing posts from March, 2018

मोहिमेतील एक अविस्मरणीय आठवण.

Image
★मोहिमेतील न विसरता येणारी आठवण★ मोहिमेचा दिवस ४था (२९ जानेवारी) वेळ दुपारी ४ वाजता.. ठिकाण - मोहिमेचा भंडारा (गाव लक्षात नाही.)          आम्ही चार जण स्वागत, रोहित (रोह्या) , पैलवान आणि मी. बाकी आमचे पाच मित्र चुकलेले(किंवा आम्ही चुकलेलो😄)       तर झालं असं की बलकवडी मुक्कामावरून निघाल्यावर मोहिमेच्या प्रचंड गर्दीतून सर्वजण रायरेश्वरकडे निघालो खरे पण गर्दीमुळे आणि एकेरी रस्ता असल्याने आमुची चुकामुक झाली. कित्येक तास एकेरी रांगेत रस्ता चढून डोंगरावर आलो आणि थोडाफार खाऊन (जे थोडंच शिल्लक होत) आणि लिंबूपाणी पिऊन परत डोंगर उतरण्यासाठी एकेरी रांगेत लागलो, उतरत उतरत खाली पोहोचायला आम्हला ४ वाजले. थोडंफारच खाल्ल्याने भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणावर पोहोचलो आनि तिथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. सांगायला तर तो फक्त मसाले भात आणि आमटीच होती पण त्याची तुलना पंचपक्वनाहूनही अधिक होती आमच्यासाठी. पोटभर (पोट भरून थोडं वर😅) जेऊन आम्ही रायरेश्वर कडे जायला मार्गस्थ झालो.                डोंगर चढून उतरल्याने आणि पोट भरून जेवल्याने आम्हाला हळूहळू सुस्ती यायला लागली पा

!! श्रीराम मंदिर , चाफळ !!

Image
                   सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.       समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. त्यानंतर चाफळ गाव स

विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली

Image
..विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली..      इतिहासात मराठ्यांची राजधानी असणारी ऐतिहासिक सातारा नागरी आणि सातारा जिल्हा संपुर्ण जिल्ह्यात मराठा इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे. अशाच मराठा इतिहासाच्या खुणा असणारे एक ठिकाण सातारा पासून चार किमी अंतरावर आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर असल्यामुळे या गावाचे दोन भाग आहेत अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाध्या नदीच्या काठी आहेत. याशिवाय प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात येथे एकूण दहा मंदिरे बांधली असून ती सर्व नदीच्या काठावर आहेत. आज विश्वेश्वर मंदिराबद्दल बोलू बाकी मंदिराबद्दल परत कधीतरी लिहिनच. ..विश्वेश्वर मंदिर..         विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमस्थानावर आहे. सातारा गेझेटिअर नुसार हे मंदिर १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे . नदीच्या बाजूने प्रवेश आलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत.  तारकाकृती असणाऱ्या या मंद