Posts

Showing posts from October, 2017

खंडेराया स्तोत्र

                 मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला । हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।। कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला । बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ  चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।    त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।। ज्यांनान कळे तुझ्या भक्तीचे वर्म । त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।। जयदेव जयदेव जय खंडेराया ।अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।। तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव । जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।। मध्वनाथ जपतो येळकोट भैरव । निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

!!. सौदामिनी .!!

!!.  सौदामिनी .!! आधीच धुमसत होते अंतर, त्यातच ठिणगी पडली जशी; सुरुंग उडला जसा निघाला सहा शिपायांनिशी. -१ राव इरेचा असा, पेटता डोंबच त्याच्या मनी, कडकडत्या खडगात नाचती तृषर्त सौदामिनी. -२ सुर्यरथाचे अश्व निखळले आले पृथ्वीवरी, चौखुर उधळत धरणी विंधीत गेले वार्‍यावरी. -३ शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी, काळोखाच्या छाताडावर थै थै नर्तन करी. -४ सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा धीर, वीर न वेडे पीर निघाले सात शीवाचे तीर. -५ - श्री.शिरीष गोपाळ देशपांडे. तव शौर्याचा एक अंश दे ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे !  तव तेजांतिल एक किरण दे ! जीवनांतला एकच क्षण दे !  त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ! पुसू पानिपत !  पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !! "राजवंदना" - बाबासाहेब पुरंदरे

औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट

Image
औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट.      २५ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला . आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला. ५ जून १६५९ रोजी औरंगजेबाने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला आणि ९ जून रोजी दारा आणि सिपाहर शिकोह या दोघांना कैद केले. दारा पकडल्यागेल्यानंतर दाराला पूर्ण कल्पना होती कि आपण मारले जाणार आहोत. औरंगजेबाने दारासोबत केलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन मनुचीने आपल्या " स्टोरियों द मोगोर " या ग्रंथात केली आहे तो लिहितो..         दाराच्या देहांताच्या शिक्षेचा हुकूम काढण्यापूर्वी औरंगजेबाने त्याला निरोप पाठवून असे विचारली कि " दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते आणि मला ( औरंगजेबाला ) तू कैद केले असतेस तर तू काय केले असतेस ? " काही जरी झाले तरी औरंगजेब आपल्याला जिवंत ठेवणार नाही आणि हा प्रश्न आपला उपहास करण्यासाठीच विचारलेला आहे हे दारास ठाऊक होते. दाराने राजपुत्र या दृष्टीने आप...

श्री समर्थ रामदास स्वामी

Image
हा लेख मी मार्च 2015 मध्ये लिहिला होता त्यामुळे काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. चूक भूल देणे घेणे.._/\_ जय श्री राम श्री राम समर्थ आज राम नवमी सर्वाना हार्दिक शुभेच्या.... तसेच श्री रामचंद्राचे परम भक्त श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्मदिवस.  त्यानिमित्त समर्थां विषयी थोड़ी माहिती..... श्री समर्थांचे मूळ नाव नारायण ठोसर-कुलकर्णी. त्रिम्बकपंत हे त्यांचे आजोबा व सूर्याजीपंत हे वडील सदैव परमेश्वर भक्तित निमग्न असत. अशा थोर कुळात श्री सूर्यनारायनाने अंशेकरुन  सौ. राणुबाई पोटि शके १५३०  मधे चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी किलक नाम सवत्सर या शुभ दिनी मध्यानकाली जांब येथे समर्थ यांच्या रूपाने अवतार धारण केला ... पुढे समर्थांनी कृष्णतीरी राहून जग उद्धार व धर्मसंस्थापना  केली आणि ठोसर कूल पावन केले . समर्थानी सारा महाराष्ट्र देश पावन केला आणि सनातन वैदिक धर्माची ध्वजा अखिल भरतखंडात फडकवली.... "राघवाचा दास मी झालो पावन ।। पतित तो कोण उरो शके"  ।। या दुर्दम्य धड़ाडीने श...

शिवरायांचे सरसेनापती

Image
🚩जय शिवराय निर्मिले स्वराज्य हिंदवी //                                                लाजले कि शशिरवि // प्रतिपच्चंद्र लेखवि //                          किर्ति ऐसी जाहली//          केवळ नूतन सृष्टी निर्माण करनारे छत्रपती शिवाजी महाराज हे आणि या नूतन सृष्टीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करनारे त्यांचें शूर" सरसेनापती" यांविषयी सर्वांच्याच मनात आदराचे स्थान आहे .         शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रभाव हिंदुस्थानातील सर्वांच्या मनावर आहे अशा छत्रपती शिवाजी महराजांनी ..... " ज्या ज्या उपाये शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करुन साल्हेरी - अहिवंतापासुन चंदि- कावेरी तिरपर्यंत निष्कटक राज्य; शतावधि कोटकिल्ले , तैसिच जलदुर्गे व कितेक विषम स्थळे हस्तगत केली....." दिगंतिविख्यात कीर्ती संपादिली. लोकसंग्रह केला. मातृभूमीचे संरक्षण हे...

मराठा लष्कर

Image
|| श्री मल्हारीमार्तण्ड ||    लष्कर हे राज्याचे बळ असते. लष्करी प्राविण्यास माणसामधे शिस्तीची गरज असते आणि त्यांच्या नेतृत्वास सामान्य ज्ञानाची आणि प्रचंड कल्पनाशक्तीची गरज असते. या सर्व गोष्टींसोबत हवी असते निष्ठा आणि एक प्रकारची राष्ट्रीय वृत्ती.      देवगिरीच्या रामदेवराय यादवाचे स्वतंत्र राज्य प्रचंड सेनादल असतानाही अल्लाउद्दीन खिलाजीच्या लहान सेनेने जिंकून घेतले. पुढे त्याच्या मुलाने आणि जावयाने पारतंत्र्याचे जोखड उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ...!! सेनादल असतानाही हरण्याचे कारण होते सेनेची निष्ठा ही केवळ राजापुरती मर्यादित होती . संपूर्ण राज्यासाठी नव्हती . त्यानंतर अनेक शतके मराठ्यांना स्वातंत्र्य पाहता आले नाही.        पण मधल्या काळात मराठे गप्प नव्हते . ते लढत होते , झुंजत होते , रक्तपात करत होते . पण ते लढत होते परकीय सत्तेसाठी आणि तेही स्वकीयांविरुद्ध . तेहि वतनासाठी . त्यांच्याजवळ राष्ट्रिय वृत्ती नव्हती असे नाही पण त्यांच्यातील राष्ट्रिय वृत्तीची कल्पना अजुन  निर्माण झाली नव्हती.   ...

शिवभूषण निनादराव बेडेकर

Image
!!.. मला न पाहता आलेले निनादराव ..!! !!.. शिवभूषण निनादराव बेडेकर..!!      'श्री आदिशक्ती तुळजा भवानी ' हे शब्द कानी पडावे आणि पटकन डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहावी. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीत बोलावं आणि सर्व श्रोत्यांनी ते आपल्या कानात साठवाव.. असे व्यक्तिमत्व..       दुर्दैवाने " निनादराव बेडेकर " यांना भेटण्याचा किंवा पाहण्याच्या, ऐकण्याचा  योग कधी आलाच नाही . त्यांच्या गेल्यानंतर मला त्यांच्या कार्याची ओळख झाली.. २ वर्ष झाली असतील फेसबुक वगैरे सोशल मीडियावरून निनादराव गेल्याचे समजले अनेकजण त्यांच्या आठवणी फेसबुक वर टाकत होते त्या सर्व आठवणी वाचून कोणीतरी मोठे व्यक्ती आपल्यातून गेले आहेत याची जाणीव मला झाली.     मी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला , थोड्या दिवसात मला निनादराव यांच्या सर्व व्याख्यानांची लिंक मिळाली आणि मी सर्व डाउनलोड केली..            निनादजींचे पाहिले मी ऐकलेले व्याख्यान होते.. " शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण"  . हे व्याख्यान ऐकून मी अक्षरशः निनादज...

हंबीरराव मोहिते यांची तलवार

Image
!!..हंबीरराव मोहिते यांची तलवार..!!        समज - गैरसमज समज -       अनेक दिवसांपासून ( खरंतर महिन्यांपासून ) सोशल मीडियावर एका तलवारीचा फोटो फिरतोय आणि त्यासोबत एक पोस्ट फिरत आहे की " ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार याच तलवारीने त्यांनी प्रतापगड च्या युद्धात ३०० शत्रू मारले म्हणून यावर ३ शिक्के कोरलेले आहेत"  सदरची तलवार पाहिल्यावर कोणीही सांगेल की ती बनावट आहे , अशी कोणतीही तलवार उपलब्ध नसून या फोटोतील तलवार ( चित्र क्र.१ ) बनावट आहे. गैरसमज.-         प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरात एक मराठा मुठीची धोप तलवार ठेवलेली आहे. जनमानसात असा समज आहे की ती तलवार ' सरसेनापती हंबीरराव मोहिते ' यांची आहे पण माझ्या मते तो एक गैरसमज आहे . ती तलवार हंबीरराव मोहिते यांची नाही.        भवानी मातेच्या मंदिरातील त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हंबीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हंबीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक विराची आह...

स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेधे

Image
!! वतन साहेबाच्या पायावरी ठेवले !!       अफजलखान स्वारीच्या वेळी कान्होजी नाईक जेधे यांना मावळच्या देशमुखबराबरी फर्मान आले होते ते फर्मान घेऊन आपल्या पाच पुत्रांसोबत शिवाजी राजेंकडे राजगड येथे गेले आणि त्यांना फर्मान दाखवले तेव्हा शिवाजीराजे म्हणाले की,       "तुमचे शेजारी केदारजी व खंडोजी खोपडे देशमुख ताा उत्रोली हे अफजलखानाकडे गेले. तुम्ही पातशाही हुकूम मोडून राहिले म्हणजे वतनास अपाये होईल. जिवावरी गोष्ट येऊन संकट पडले, याकरिता तुम्हीही जाणे." त्यावरी कान्होजी नाईक बोलिले की,       महाराजांनी आपली क्रिया घेऊन तुमचे हाती दिली तेच क्रिया  व इमान आपला शाबूत आहे . 'वतन साहेबाच्या पायावरी ठेविले.' आपण व आपले लेक साहेबाच्या पुढे खस्त होऊन तेव्हा जे होणे तें होईल. कान्होजी नाईक ऐसे बोलून शपथ केली. त्यावरी राजश्री स्वामी बोलिले की , हातावरी पाणी घेऊन वतनास घालणे. आग्येप्रमाणे वतनास हातावरी पाणी घेऊन सोडिले. संदर्भ - जेधे शकावली. चित्र- गुगलवरून ●संतोष अशोक तुपे #अजरामर_उद्गार #इतिहासाच्या_पाऊलखुणा

"शिवराय गोब्राम्हणप्रतिपालकच"

Image
"गोब्राह्मणप्रतिपालक शिवराय " नरहर कुरुंदकर यांच्या व्याख्यानातून...       ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणांना नोकऱ्या देणं अशी अनेकांची समजूत आहे . पण तस काही नाहीये कारण ब्राह्मण हा वेदांचा अभ्यासक असला पाहिजे , हा वेदांचा अभ्यासक असलेला ब्राह्मण जर धार्मिक कृत्ये करतो , या धर्मकृत्यांचे संरक्षण आणि त्याचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी नोकऱ्या , व्यापार आणि जीवनाच्या सगळ्याच नाड्या आखडून धरण्याची परवानगी म्हणजे ' ब्राह्मणप्रतिपालक'.          'गोब्राह्मणप्रतिपालक' यातील गो म्हणजे गाय नावाचं जनावर नव्हे हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. गो हे हिंदू धर्माच्या अभिमानच प्रतीक आहे. उदा. राष्ट्रध्वज हा चिंध्यांचा तुकडाच असतो, त्यात एक तांबडा कापड असतो ,एक पांढरा कपडा असतो आणि एक हिरवा कपडा शिवलेला असतो. पण ज्यादिवशी तो सगळ्या राष्ट्राच्या वैभवाचं प्रतीक म्हणून उभा राहतो त्या दिवशी तो राष्ट्रध्वज उभा कि आडवा , खाली का वर हा जगण्या मारण्याचा प्रश्न होऊन जातो.       हे जे गाई नावाचं जनावर आहे दोन शिंगांचं हे जोपर्यंत जनावर ...

शिवरायांची धार्मिकता

Image
जय शिवराय हिंदुधर्माभिमानी शिवराय शिवराय हे हिंदूधर्माभिमानी होते काय .....???? शंका वाटतेय....?? बर पुढील मुद्दे वाचा.. 🌑 शिवरायांची धार्मिकता आणि देवस्थानांना केलेली मदत  १. दादाजी नरसप्रभु आणि शिवरायांनी रायरेश्वराच्या पुजेअर्चेची व्यवस्था केली (२६ मे १६४२) २. पुण्यात आल्यावर शिवरायांनी आणि आईसाहेबानी एक गणपतीचे मंदिर बांधले त्यास नंदादीप दिला.(१९ मार्च १६४६) तोच पुण्याच्या प्रसिद्ध कसब्याचा गणपती. ३. दादाजी नरसप्रभु देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात राजे म्हणतात...--                 श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रिलगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करुण पुरविणार आहे. ४. सभासद बखर सांगते -  मुलूखांत देवदेवस्थाने जागजागा होती त्यास दिवाबत्ती , नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. वैदिक ब्राम्हण यांसी योगक्षेम, ब्राम्हण विद्यावंत, वेदशास्त्रसंपन्न, ज्योतिषी, अनुष्ठानी, तपस्वी गावोगावी सत्पुरुष पाहून त्यांचे कुटुंब पाहू...

ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे काय..??

Image
..शहाजहान आणि मुमताजचे अमर प्रेम.. (कि विकृत प्रेम )     मोगल बादशहा खुर्रम उर्फ शहाजहान आणि त्याची बायको 'मुमताजमहाल' यांच्या प्रेमाचे आपल्याकडे दाखले दिले जातात. अमर प्रेम वगैरे उपमा दिल्या जातात . " प्यार होतो शहाजहान जैसा हो, जिसने अपने प्यार के लिये ताजमहल बनवाया " असे डायलॉग आपल्याकडे सिनेमातून तर येतच असतात. पण हे नक्की प्रेम आहे का ? इतिहास काय म्हणतो हे आपण पाहू.          शहाजहान आणि मुमताजचे लग्न झाल्यापासून मुमताज वीस वर्षे जगली. शहाजहानाचे मुमताज वर इतकं प्रेम (?) होतं कि या वीस वर्षात मुमताजला चौदा अपत्ये झाली. त्यामधील पहिली सहा मुले तिला इ. स. १६१३ ते १६१८ अशी सलग सहा वर्षे झाली ( प्रत्येक वर्षी एक ) या चौदामधील आठ मुलगे आणि सहा मुली होत्या , या सततच्या प्रसूतीमुळे त्यापैकी आठ अपत्ये लहानपणीच मरण पावली. आणि एवढं झाल्यानंतर व्हायचं तेच झालं मुमताजचा मृत्यू तेरा वेळा प्रसूत झाल्यानंतर चौदाव्या खेपेस बुऱ्हाणपूर येथे प्रसूती विकारानेच झाला...( ७ जून १६३१)  या गोष्टीला आपल्याकडे अमर प्रेम , the great love story अस संबो...