Posts

मोहिमेतील एक अविस्मरणीय आठवण.

Image
★मोहिमेतील न विसरता येणारी आठवण★ मोहिमेचा दिवस ४था (२९ जानेवारी) वेळ दुपारी ४ वाजता.. ठिकाण - मोहिमेचा भंडारा (गाव लक्षात नाही.)          आम्ही चार जण स्वागत, रोहित (रोह्या) , पैलवान आणि मी. बाकी आमचे पाच मित्र चुकलेले(किंवा आम्ही चुकलेलो😄)       तर झालं असं की बलकवडी मुक्कामावरून निघाल्यावर मोहिमेच्या प्रचंड गर्दीतून सर्वजण रायरेश्वरकडे निघालो खरे पण गर्दीमुळे आणि एकेरी रस्ता असल्याने आमुची चुकामुक झाली. कित्येक तास एकेरी रांगेत रस्ता चढून डोंगरावर आलो आणि थोडाफार खाऊन (जे थोडंच शिल्लक होत) आणि लिंबूपाणी पिऊन परत डोंगर उतरण्यासाठी एकेरी रांगेत लागलो, उतरत उतरत खाली पोहोचायला आम्हला ४ वाजले. थोडंफारच खाल्ल्याने भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणावर पोहोचलो आनि तिथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. सांगायला तर तो फक्त मसाले भात आणि आमटीच होती पण त्याची तुलना पंचपक्वनाहूनही अधिक होती आमच्यासाठी. पोटभर (पोट भरून थोडं वर😅) जेऊन आम्ही रायरेश्वर कडे जायला मार्गस्थ झालो.                ड...

!! श्रीराम मंदिर , चाफळ !!

Image
                   सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.       समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श...

विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली

Image
..विश्वेश्वर मंदिर , संगम माहुली..      इतिहासात मराठ्यांची राजधानी असणारी ऐतिहासिक सातारा नागरी आणि सातारा जिल्हा संपुर्ण जिल्ह्यात मराठा इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे. अशाच मराठा इतिहासाच्या खुणा असणारे एक ठिकाण सातारा पासून चार किमी अंतरावर आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर असल्यामुळे या गावाचे दोन भाग आहेत अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाध्या नदीच्या काठी आहेत. याशिवाय प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात येथे एकूण दहा मंदिरे बांधली असून ती सर्व नदीच्या काठावर आहेत. आज विश्वेश्वर मंदिराबद्दल बोलू बाकी मंदिराबद्दल परत कधीतरी लिहिनच. ..विश्वेश्वर मंदिर..         विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमस्थानावर आहे. सातारा गेझेटिअर नुसार हे मंदिर १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे . नदीच्या बाजूने प्रवेश आलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत.  ता...

खंडेराया स्तोत्र

                 मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला । हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।। कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला । बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ  चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।    त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।। ज्यांनान कळे तुझ्या भक्तीचे वर्म । त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।। जयदेव जयदेव जय खंडेराया ।अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।। तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव । जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।। मध्वनाथ जपतो येळकोट भैरव । निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।। जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

!!. सौदामिनी .!!

!!.  सौदामिनी .!! आधीच धुमसत होते अंतर, त्यातच ठिणगी पडली जशी; सुरुंग उडला जसा निघाला सहा शिपायांनिशी. -१ राव इरेचा असा, पेटता डोंबच त्याच्या मनी, कडकडत्या खडगात नाचती तृषर्त सौदामिनी. -२ सुर्यरथाचे अश्व निखळले आले पृथ्वीवरी, चौखुर उधळत धरणी विंधीत गेले वार्‍यावरी. -३ शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी, काळोखाच्या छाताडावर थै थै नर्तन करी. -४ सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा धीर, वीर न वेडे पीर निघाले सात शीवाचे तीर. -५ - श्री.शिरीष गोपाळ देशपांडे. तव शौर्याचा एक अंश दे ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे !  तव तेजांतिल एक किरण दे ! जीवनांतला एकच क्षण दे !  त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ! पुसू पानिपत !  पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !! "राजवंदना" - बाबासाहेब पुरंदरे

औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट

Image
औरंगजेबाने केलेला दाराचा शेवट.      २५ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला . आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला. ५ जून १६५९ रोजी औरंगजेबाने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला आणि ९ जून रोजी दारा आणि सिपाहर शिकोह या दोघांना कैद केले. दारा पकडल्यागेल्यानंतर दाराला पूर्ण कल्पना होती कि आपण मारले जाणार आहोत. औरंगजेबाने दारासोबत केलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन मनुचीने आपल्या " स्टोरियों द मोगोर " या ग्रंथात केली आहे तो लिहितो..         दाराच्या देहांताच्या शिक्षेचा हुकूम काढण्यापूर्वी औरंगजेबाने त्याला निरोप पाठवून असे विचारली कि " दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते आणि मला ( औरंगजेबाला ) तू कैद केले असतेस तर तू काय केले असतेस ? " काही जरी झाले तरी औरंगजेब आपल्याला जिवंत ठेवणार नाही आणि हा प्रश्न आपला उपहास करण्यासाठीच विचारलेला आहे हे दारास ठाऊक होते. दाराने राजपुत्र या दृष्टीने आप...

श्री समर्थ रामदास स्वामी

Image
हा लेख मी मार्च 2015 मध्ये लिहिला होता त्यामुळे काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. चूक भूल देणे घेणे.._/\_ जय श्री राम श्री राम समर्थ आज राम नवमी सर्वाना हार्दिक शुभेच्या.... तसेच श्री रामचंद्राचे परम भक्त श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्मदिवस.  त्यानिमित्त समर्थां विषयी थोड़ी माहिती..... श्री समर्थांचे मूळ नाव नारायण ठोसर-कुलकर्णी. त्रिम्बकपंत हे त्यांचे आजोबा व सूर्याजीपंत हे वडील सदैव परमेश्वर भक्तित निमग्न असत. अशा थोर कुळात श्री सूर्यनारायनाने अंशेकरुन  सौ. राणुबाई पोटि शके १५३०  मधे चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी किलक नाम सवत्सर या शुभ दिनी मध्यानकाली जांब येथे समर्थ यांच्या रूपाने अवतार धारण केला ... पुढे समर्थांनी कृष्णतीरी राहून जग उद्धार व धर्मसंस्थापना  केली आणि ठोसर कूल पावन केले . समर्थानी सारा महाराष्ट्र देश पावन केला आणि सनातन वैदिक धर्माची ध्वजा अखिल भरतखंडात फडकवली.... "राघवाचा दास मी झालो पावन ।। पतित तो कोण उरो शके"  ।। या दुर्दम्य धड़ाडीने श...