अंतर्मन खुणावत आहे
    अंतर्मन खुणावत आहे.                एक दिवस असाच मनामध्ये असंख्य प्रश्नांचे काहूर घेऊन बाहेर पडलो. दुचाकीवर स्वार होऊन वाट दिसेल त्या दिशेने निघालो, वळणे वळणे घेत आणि ओबडधोबड रस्त्यावर चालून शांत , निर्जन, एकाकी आणि प्राचीन आशा शिवमंदिराजवळ येऊन थांबलो.  मनाला शांती मिळेल आणि प्रश्नांची उत्तरे ही मिळतील म्हणून मंदिरात जाऊ म्हटलं.          प्राचीन पण मोडकळीस आलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. समोर गाभाऱ्यात नुकतीच कोणीतरी पूजा करून गेलं असावं, कारणं हवेत अजूनही त्या उदबत्तीचा सुगंध दरवळत होता आणि शिवलिंगावर वाहिलेली पांढरी फुलं अजून टवटवीत होती. गाभाऱ्यातील दिवा मंदपणे तेवत होता.  गाभाऱ्यात जायची इच्छा नव्हती म्हणून सभामंडपात एका खांबाला टेकून बसलो. मंदिरातील गारवा मनाला शांती देत नव्हता मनातील प्रश्न अजूनही तसेच होते.   असे का.?? माझ्यासोबतच का..?? माझं काय चुकलं..??  का मलाच नेहमी अपयश..? का माझ्यासोबतच अडथळ्यांची शर्यत..??   'रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा' असा मी म्हणतोय खरं पण खरंच माझा रंग वेगळा आहे का..?...