शिवभूषण निनादराव बेडेकर
!!.. मला न पाहता आलेले निनादराव ..!!
!!.. शिवभूषण निनादराव बेडेकर..!!
'श्री आदिशक्ती तुळजा भवानी ' हे शब्द कानी पडावे आणि पटकन डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहावी.
त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीत बोलावं आणि सर्व श्रोत्यांनी ते आपल्या कानात साठवाव..
असे व्यक्तिमत्व..
दुर्दैवाने " निनादराव बेडेकर " यांना भेटण्याचा किंवा पाहण्याच्या, ऐकण्याचा योग कधी आलाच नाही . त्यांच्या गेल्यानंतर मला त्यांच्या कार्याची ओळख झाली..
२ वर्ष झाली असतील फेसबुक वगैरे सोशल मीडियावरून निनादराव गेल्याचे समजले अनेकजण त्यांच्या आठवणी फेसबुक वर टाकत होते त्या सर्व आठवणी वाचून कोणीतरी मोठे व्यक्ती आपल्यातून गेले आहेत याची जाणीव मला झाली.
मी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला , थोड्या दिवसात मला निनादराव यांच्या सर्व व्याख्यानांची लिंक मिळाली आणि मी सर्व डाउनलोड केली..
निनादजींचे पाहिले मी ऐकलेले व्याख्यान होते.. " शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण" .
हे व्याख्यान ऐकून मी अक्षरशः निनादजींचा चाहताच झालो..
निनादरावांची सर्व व्याख्याने मी ऐकली.
जो ऐकावं ते नवीनच. अशी माझी गत झाली .
शांत आणि स्पष्ट बोलणं, सोप्या भाषेत संदर्भांची माहिती, शिवकालीन इतिहासात नेऊन सोडणारी ओघवती वाणी , तुळजा भवानीच्या नावाने व्याख्यानांची सुरुवात आणि शेवटी एखादे काव्य. , कवी भूषणाचे छंद केवळ त्यांनी म्हणावे आणि आपण पुनः पुन्हा ऐकत राहावे.
जाणता राजा या नाटकातील औरंगजेबाच्या दरबारातील प्रसंग ऐकावा तो केवळ त्यांच्याकडूनच.
आपल्याकडे ' वक्ता दश सहस्त्रेशु' अस काहीतरी म्हणतात ते निनादरावांना अगदी लागू होत.
हे लेखन कशासाठी.?
थोर इतिहास संशोधक, मोडी आणि पर्शियन लिपीचे जाणकार, उत्तम वक्ते " शिवभूषण निनादराव बेडेकर " यांचा आज स्मृतिदिन म्हणून.
आणि ते गेल्यानंतर मला त्यांच्याबद्दल कळलं म्हणून.( खरंतर ही खंत कायम राहील.)
निनादरावांसारख्या थोर व्यक्तीस भेटणं राहुद्या ओ साधं पाहता देखील आलं नाही म्हणून..
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना.._/\_
निनादरावांचे नाव निघालं की दोन ओळी कानात घुमतात..
!! .. समरभूमीचे सनदी मालक , शतयुद्धाचे मानकरी..।।
...रणफदीची जात आमुची , कोण आम्हा भयभीत करी..।।
-संतोष अशोक तुपे.
#Ninadravbedekar #10may #Mystory
#shivabhushan

आ जून काही विडिओ माहित आहेत का
ReplyDeleteऑडिओ link
YouTub वरची विडिओ पाहिलेत 5 part आहेत