मोहिमेतील एक अविस्मरणीय आठवण.

★मोहिमेतील न विसरता येणारी आठवण★ मोहिमेचा दिवस ४था (२९ जानेवारी) वेळ दुपारी ४ वाजता.. ठिकाण - मोहिमेचा भंडारा (गाव लक्षात नाही.) आम्ही चार जण स्वागत, रोहित (रोह्या) , पैलवान आणि मी. बाकी आमचे पाच मित्र चुकलेले(किंवा आम्ही चुकलेलो😄) तर झालं असं की बलकवडी मुक्कामावरून निघाल्यावर मोहिमेच्या प्रचंड गर्दीतून सर्वजण रायरेश्वरकडे निघालो खरे पण गर्दीमुळे आणि एकेरी रस्ता असल्याने आमुची चुकामुक झाली. कित्येक तास एकेरी रांगेत रस्ता चढून डोंगरावर आलो आणि थोडाफार खाऊन (जे थोडंच शिल्लक होत) आणि लिंबूपाणी पिऊन परत डोंगर उतरण्यासाठी एकेरी रांगेत लागलो, उतरत उतरत खाली पोहोचायला आम्हला ४ वाजले. थोडंफारच खाल्ल्याने भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही भंडाऱ्याच्या ठिकाणावर पोहोचलो आनि तिथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. सांगायला तर तो फक्त मसाले भात आणि आमटीच होती पण त्याची तुलना पंचपक्वनाहूनही अधिक होती आमच्यासाठी. पोटभर (पोट भरून थोडं वर😅) जेऊन आम्ही रायरेश्वर कडे जायला मार्गस्थ झालो. ड...