लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

// लोकशाहीर आण्णाभाऊ साठे // 'आण्णाभाऊ साठे' म्हटलं कि आठवते एक लावणी "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली" . प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवंताला लाभेल हे सांगता येणं कठीण. नाहीतर , वाटेगावाच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला 'अण्णाभाऊ साठे" नावाचा मुलगा ज्याला वयाच्या १५-१६ व्या वर्षापर्यंत धड अक्षर ओळखही झालेली नव्हती ,तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवतो, 'फकिरा' या त्यांच्या बावनकशी कादंबरीची सोळा आवृत्ती निघते, मराठी व्यतिरिक्त भाषाही माहित नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो , आणि त्यांच्या साहित्यकृतींची भाषांतरे भारतीय नव्हे तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात . याचा अर्थ काय लावायचा.? भाऊ मांगांच्या घरात जन्मलेल्या अण्णांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवले. समाज्याच्या अपेक्षेचे चटके सहन केले, वेठबिगारीतील अमानुष पिळवणूक भोगली, गिरणीकमगारांच्या हलपेष्टा आणि शोषण सोसले आणि झोपडपट्टीतील बकालपणाची सोबतहि केली इतके अपार दुःख सोसलेल्या अण्णांची जिद्द मात्र प्रकर्षाने द...